पराड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद

प्राथमिक शाळा पराडच्या शतक महोत्सवानिमित्त आयोजन

चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा पराडच्या शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त सोमवार ९ मार्च रोजी शतक महोत्सव समिती शाळा पराड यांच्या संकल्पनेतून ज्ञानज्योती आदिवासी व मागासवर्गीय शिक्षण संस्था ठाणे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मोफत आरोग्य शिबिरास परिसरातील ग्रामस्थानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

दरम्यान शिवसेना उपतालुकाप्रमुख आतिक शेख यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उदघाट्न करण्यात आले. यावेळी शतक महोत्सव समिती अध्यक्ष प्रदिप आवळेगावकर, उपाध्यक्ष निळकंठ पाटकर ज्ञानज्योती आदिवासी व मागासवर्गीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा जया पराडकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा दीपलक्ष्मी पराडकर, तृप्ती लाड, प्रविण सावंत जिल्हा रुग्णालयाचे डॉ. समृद्धी कांबळे, डॉ. कपिल दानी, डॉ. रक्षा तवरावाला, डॉ. सौरव रंजित, डॉ. शाहीन अमीर, नागेश पवार, प्रशालेचे मुख्याध्यापक कृष्णा कालकुंद्रीकर, सहाय्यक शिक्षिका शितल पाटील, सामाजिक कार्यकर्ते सलीम शेख, शामू आवळेगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शतक महोत्सव समितीच्या वतीने उपस्थित सर्व वैद्यकीय अधिकारी व डॉक्टर यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर मोफत आरोग्य शिबिरासाठी नोंदणी केलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. औषधाची आवश्यकता असलेल्या काही रुग्णाना यावेळी मोफत औषधंही वितरित करण्यात आली.

यानंतर माजी शिक्षकांचा सत्कार सोहळा आणि आजी- माजी विद्यार्थ्यांचा मेळावाहीं उत्साहात संपन्न झाला.

error: Content is protected !!