वैभववाडी (प्रतिनिधी) : संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्हा कुंभार समाज समिती आयोजित युवा समाज गौरव पुरस्कार उंबर्डे कुंभारवाडी (ता. वैभववाडी) येथील युवा कार्यकर्ते संदेश तुळसणकर यांना प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
हा पुरस्कार श्री सतीश कुंकळीकर (राष्ट्रीय अध्यक्ष, गोवा) यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. समाजातील युवकांना प्रेरणा देणारे कार्य तसेच सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत संदेश तुळसणकर यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
या कार्यक्रमास संस्थापक प्रदेशाध्यक्ष सतीश दादा दरेकर, कोकण विभाग अध्यक्ष प्रकाश साळवी, प्रदेश सरचिटणीस विलास गुडेकर, प्रदेश उपाध्यक्ष यशवंत शेदुलकर, कार्याध्यक्ष महेश सायकर , डॉ. सुरेश काळे (केईएम हॉस्पिटल, मुंबई) तसेच सिंधुदुर्ग जिल्हा कुंभार समाज समितीचे अध्यक्ष चंद्रकांत कुंभार, सचिव महेश कुंभार उपाध्यक्ष दिलीप सांगवेकर उपस्थित होते.
यावेळी संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ, सिंधुदुर्ग चे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संदेश तुळसणकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.












