नूतन जि प उपाध्यक्ष दादा साईल यांचे पं स सदस्य गुरू शिंदेंनी केले अभिनंदन

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी शिवसेनेचे तुकाराम उर्फ दादा साईल यांची आज बिनविरोध निवड झाली. दादा साईल यांची जि प उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्यानंतर कणकवली पंचायत समितीतील खारेपाटण पंचायत समिती सदस्य गुरुप्रसाद शिंदे यांनी दादा साईल यांची उपाध्यक्ष दालनात सदिच्छा भेट घेऊन पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदन केले. जि प उपाध्यक्ष पदाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या माध्यमातून लक्षणीय कारकीर्द घडू दे अशा शुभेच्छा पं स सदस्य गुरूप्रसाद शिंदे यांनी नवनिर्वाचित जि प उपाध्यक्ष दादा साईल यांना दिल्या.

error: Content is protected !!