नूतन जि प अध्यक्ष प्रमोद कामत यांची नारकर दाम्पत्याकडून सदिच्छा भेट

जि प सदस्य अनुराधा नारकर, भाजपा तालुकाध्यक्ष महेश नारकर यांनी दिल्या शुभेच्छा

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपाचे प्रमोद मधुकर कामत यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल भाजपा पडेल मंडल तालुकाध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर, जि प सदस्य अनुराधा नारकर यांनी अध्यक्ष दालनात सदिच्छा भेट घेत शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळ खडपे उपस्थित होते. तब्बल 3 वर्षे आणि 360 दिवसानंतर आज 16 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. पिठासन अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या सभेत जिल्हा परिषद अध्यक्षपदी महायुतीतील भाजपाचे प्रमोद कामत आणि उपाध्यक्षपदी शिवसेनेचे तुकाराम उर्फ दादा साईल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रमोद कामत यांची बिनविरोध जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर महेश उर्फ़ बंड्या नारकर आणि जि प सदस्य अनुराधा नारकर यांनी कामत यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!