कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरचे खासदार श्री शाहू छत्रपती महाराज व महाराष्ट्र विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते तथा कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय आमदार सतेज बंटी पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार आज कोल्हापूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन प्रल्हाद चव्हाण भाई यांच्या प्रमुख उपस्थितीत, भाजप सरकारच्या चुकीच्या परकिय धोरणामुळे देशात निर्माण झालेल्या गॅस टंचाई तसेच या टंचाई काळातच गॅस सिलेंडरच्या किमती अचानक वाढवल्याने त्याचा फटका सर्वसामान्यांना बसला असून या विरोधात आज जिल्हा काँग्रेस कमिटीकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सूर्यकांत पाटील बुद्धीहाळकर जी, प्रदेश सरचिटणीस तोफिक मुल्लाणी, महाराष्ट्र महिला प्रदेश काँग्रेसच्या सचिव वैशालीताई महाडिक, प्रदेश प्रतिनिधी विनायक घोरपडे, एम एस सी बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक, शहर ब्लॉक अध्यक्ष संपतराव चव्हाण पाटील, कोल्हापूर महापालिका विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजित बोंद्रे यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण सोनवणे,सचिन शेंडे,अमर समर्थ,प्रवीण केसरकर, प्रतापसिंह जाधव, विनायक फाळके, विशाल चव्हाण, सुभाष बुचडे.प्रतीक्षा उत्तूरे,अर्चना बिरांजे.पुष्पा नरुटे, रजनीकांत सरनाईक,अरुणा गवळी,.स्वाती कांबळे यांच्यासह सरलाताई पाटील, भारतीताई पोवार, वेदवती मोहिते,शुभांगी पाटील, उज्वला चौगुले वैशाली पाडेकर मनीषा पवार,लीला धुमाळ पूजा आरडे, संध्या घोटणे तसेच जनार्दन कांबळे,रजनीकांत सरनाईक, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष उदय पवार, प्रथमेश कांबळे, रियाज सय्यद, गिरीश शिंदे, कोल्हापूर जिल्हा अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष वसंत चांदुरकर, कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यालयीन सचिव संजय पोवार वाईकर, चंद्रकांत सूर्यवंशी, संजय पटकारे ,संगीता पाटील, श्रीकांत चव्हाण यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..










