कन्हैया पारकर यांनी अबिद नाईकांना दिल्या ईदच्या शुभेच्छा

अबिद नाईक यांच्या घरी जात शिर कुर्मा चा घेतला स्वाद

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी रमजान ईद निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अबिद नाईक यांच्या घरी जाऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. अबिद यांच्या घरी ईद निमित्त शिर कुर्माचा आस्वाद ही घेतला. अबिद नाईक आणि पारकर कुटुंबीयांच्या मैत्रीमध्ये मध्यंतरीच्या राजकारणात दरी पडली होती. एकेकाळी एकमेकांचे जिगरी यार असलेले अबिद आणि पारकर यांच्या कुटुंबियांत राजकारणाने दुरावा निर्माण झाला होता. मात्र कणकवली नगरपंचायतचे विद्यमान नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आज रमजान ईद निमित्त अबिद नाईक यांच्या घरी जाऊन नाईक कुटुंबियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!