जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत रसिका तेडोलकर प्रथम

कै.गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय त्रिंबक यांच्यावतीने कै. दादा ठाकूर स्मृती प्रित्यर्थ आयोजन

आचरा (प्रतिनिधी) : कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय त्रिंबक आयोजित कै. दादा ठाकूर स्मृती सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा शनिवार दिनांक २१ मार्च रोजी जनता विद्यामंदिर त्रिंबक प्रशालेच्या सभागृहामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत सौ.रसिका राजेंद्र तेडोलकर कसाल, कुडाळ यांनी प्रथम, हेमंत मोतीराम पाटकर, कणकवली यांनी व्दितीय सौ.उज्वला चंद्रशेखर धानजी, कणकवली यांनी तृतीय तर कु. श्रेया उमेश कुलकर्णी, ओरोस, कुडाळ यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले.

प्रथम क्रमांक विजेत्यां
स्पर्धकाला रोख रु. 2000, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, गुलाब पुष्प. व्दितीय क्रमांक विजेत्यां स्पर्धकाला रोख रु. 1500 सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, गुलाब पुष्प. तृतीय क्रमांक विजेत्यां स्पर्धकाला रोख रु. 1000 सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, गुलाब पुष्प तर उत्तेजनार्थ विजेत्या स्पर्धकाला रोख 500 रु सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, गुलाब पुष्प अशी बक्षिसे मान्यवरांचे हस्ते देऊन गौरविण्यात आले.. तर सहभाग उत्तेजनार्थ म्हणुन योगेश रविंद्र मुणगेकर, आचरा, मालवण, सुधाकर महादेव वळंजू, पणदूर, कुडाळ, काशीराम (सागर) बाळकृष्ण अपराज, चिंदर, मालवण यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश शामराव ठाकूर, (अध्यक्ष कोकण मराठी साहित्य परिषद मालवण) हे होते, वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन श्रीम . ऋजुता केळकर मॅडम ग्रंथपाल बॅ.नाथ पै वाचनालय मालवण यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्रीम. मधुरा माणंगावकर कणकवली आणि श्रीम. ऋतुजा केळकर मालवण यांनी काम पाहिले. उद्धाटन सोहळ्याचे प्रास्ताविक सुरेंद्र सिताराम सकपाळ अध्यक्ष कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय, त्रिंबक यांनी केले. प्रास्ताविकामध्ये बोलतांना स्पर्धेची रूपरेषा सांगुन या स्पर्धेचे उद्घाटक हे जिल्ह्यातील कोणत्याही वाचनालयाचे ग्रंथपाल असतात म्हणजे ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना हा मान प्रतिवर्षी दिला जातो ही या स्पर्धेची विशेष बाब आहे.शेवटी स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना धन्यवाद दिले.

पारितोषिक वितरण सोहळा सुरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला, त्यावेळी चंद्रशेखर धानजी, अरविंद कदम, रमाकांत शेटये एकनाथ गायकवाड, दोन्ही परीक्षक श्रीम. माणंगावकर मॅडम व श्रीम. केळकर मॅडम इ.उपस्थित होते. अध्यक्ष पदावरून बोलतांना सुरेश ठाकूर गुरुजी यांनी स्पर्धेचे कौतुक करताना सांगितले की कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालयाच्या या वक्तृत्व स्पर्धेचे संयोजन आणि नियोजन प्रतिवर्षी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेला मार्गदर्शक असे करण्यात येत असते.

सर्व स्पर्धक उत्तमच होते सादरीकरणही उत्तम केले पण आणि उत्तम प्रकारे स्पर्धेत सादरीकरण कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले तसेच दोन्ही परीक्षकांनी परीक्षणं उत्तम केले त्याबद्दल त्यांचे कौतुक केले व अशी स्पर्धा प्रतिवर्षी होणार असल्याचेही जाहीर केले.

कार्यक्रमासाठी ग्रंथपाल विवेक उर्फ बंडू जाधव, सहाय्यक ग्रंथपाल श्रीम. चैताली सुतार, लिपिक श्रीम. चैताली गोसावी व ग्रंथालयीनी कर्मचारी श्रीम. समिधा जाधव यांनी परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एकनाथ गायकवाड यांनी केले.

error: Content is protected !!