कलमठ नाडकर्णी नगरला कणकवली नगरपंचायतचे स्वच्छ पाणी मिळणार

कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ नाडकर्णी नगरला कणकवली नगरपंचायतचे पाणी मिळणार असल्याचे आज स्पष्ट झाले आहे. कणकवली नगरपंचायतचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या सहकार्याने आणि कलमठचे सरपंच संदीप मेस्त्री यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य होणार आहे.

कणकवली तालुक्यातील कलमठ गावातील नाडकर्णी नगरला गेले काही दिवस अस्वच्छ पाणी पुरवठा होत होता. याशिवाय पाण्याच्या वेळा देखील अनियमित होत्या. यामुळे नाडकर्णी नगर मधील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच नाडकर्णी नगर मधील विकास कामांबाबत चर्चा करण्यासाठी नाडकर्णी नगर रहिवासी संघाचे अध्यक्ष मनोज जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ कलमठचे सरपंच संदीप मेस्त्री यांना भेटले. वरील विषयावर कलमठ ग्रामपंचायत कार्यालय येथे झालेल्या सविस्तर चर्चेनंतर कणकवली नगरपंचायतचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्याशी कणकवली नगर पंचायत कार्यालयात पाणी पुरवठ्याबाबत चर्चा करण्यात आली. चर्चेअंती कणकवली नगरपंचायतचे स्वच्छ पाणी कलमठ नाडकर्णी नगरला पुरवणार असल्याचे निश्चित करण्यात आले. यामुळे नाडकर्णी नगरला यापुढे स्वच्छ पाणी नियमित वेळेनुसार मिळणार आहे.

यावेळी कलमठ ग्रामसेवक श्री कुडतरकर, नाडकर्णी नगर रहिवासी संघाचे अध्यक्ष मनोज जाधव, एकनाथ वांयगणकर, शिवम धानजी, बन्सी मालवदे, प्रदीप ढवण,पंढरीनाथ दळवी,सुरेश सावंत,विकास पेडणेकर,सुदेश देसाई, नितीन पटेल, श्रीराम जोशी, नितीन पावसकर, प्रभाकर सावंत, पूजा जाधव, सुनीता चव्हाण, आदी रहिवासी उपस्थित होते.

error: Content is protected !!