वित्त, बांधकाम आणि समाजकल्याण शिवसेनेकडे तर महिला बालविकास आणि आरोग्य शिक्षण भाजपाकडे ?
संतोष साटविलकर , रुहिता तांबे, अनुराधा नारकर प्रितेश राऊळ आघाडीवर ?
सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद विषय समिती सभापती पदांची आज निवड होत असून चार विषय समिती सभापतिपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे. खात्रीलायक माहितीनुसार वित्त बांधकाम आणि समाजकल्याण सभापतीपद शिवसेनेच्या वाट्याला तर महिला बालविकास आणि शिक्षण आरोग्य सभापती पद भाजपाच्या वाट्याला गेल्याची माहिती आहे. 16 मार्च रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड झाली होती. त्यानंतर आज 25 मार्च रोजी विषय समिती सभापती पद निवड होत आहे. विषय समितीच्या वित्त बांधकाम सभापती पदासाठी संतोष साटविलकर, समाजकल्याण सभापतिपदी जानवली मतदारसंघातील रुहिता राजेश तांबे तर महिला बालविकास सभापतीपदी देवगड तालुक्यातील पोंभुर्ले मतदारसंघातील अनुराधा महेश नारकर, आरोग्य शिक्षण सभापतीपदी प्रितेश राऊळ यांच्या नावाला पक्षश्रेष्ठींनी पसंती दिल्याचे समजत आहे.












