भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केली घोषणा
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : भाजपकडून विषय समिती सभापती पदासाठी उमेदवारांची घोषणा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केली आहे. त्यानुसार वेंगुर्ले तालुक्यातील रेडी जिल्हा परिषद मधून निवडून आलेले प्रितेश राऊळ यांची शिक्षण व आरोग्य समिती सभापती पदासाठी तर देवगड तालुक्यातील फणसगाव मतदार संघातून निवडून आलेल्या अनुराधा नारकर यांची महिला व बाल कल्याण समिती सभापती पदासाठी निवड करण्यात आली आहे. यावेळी भाजपचे गटनेते संजय बोबडी, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह भाजपचे जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.












