विनर ऑफ द इयर स्पर्धा परीक्षेत नवीन कुर्ली प्राथमिक शाळेचा विद्यार्थी कु.आदर्श प्रशांत दळवी राज्यात प्रथम

फोंडाघाट (प्रतिनिधी) : राज्यात नुकतीच ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र संचलित, विनर ऑफ द इयर स्पर्धा परीक्षा २०२६ पार पडली. यामध्ये महाराष्ट्रातून अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या परीक्षेमध्ये नवीन कुर्ली प्राथमिक शाळेचा इयत्ता दुसरी मधून कु.आदर्श प्रशांत दळवी याने १००% गुण मिळवून राज्यस्तर गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळवला असून, कु.गंधर्व सखाराम हूंबे इयत्ता पहिली मधून ९८.६७% गुण मिळवून राज्यस्तर गुणवत्ता यादीत दुसरा क्रमांक मिळवला आहे. या विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ २९ मार्च २०२६ रोजी पुणे येथील ग. दि. माडगूळकर सभागृह येथे होणार आहे.

यासोबतच नवीन कुर्ली प्राथमिक शाळेच्या भक्ती कदम, सर्वेश रामशे, विभा गोसावी, दुर्वा कापसे, उर्मी पारकर, सार्थक दळवी, क्रांती तायशेटे, साई पिळणकर, तन्मय पेडणेकर, नयन पावणे, राखी डवुर, श्लोक डवुर, काव्या कोलते. या विद्यार्थ्यांनी सुद्धा जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय गुणवत्ता यादीमध्ये चांगले यश संपादन केले आहे. यांना शाळेच्या शिक्षिका रेणुका जोशी आणि शिल्पा पवार यांनी मार्गदर्शन केले. नवीन कुर्ली शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले असून, त्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

error: Content is protected !!