चतुर्थ वर्ष कृषी पदवीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग : रासायनिक खताला गांडूळ खत उत्तम पर्याय !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : येथील कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध सेंद्रिय घटकांचा वापर करून गांडूळ खत प्रकल्प यशस्वीपणे राबविला आहे. महाविद्यालयातील चतुर्थ वर्ष कृषी पदवीचे विद्यार्थी गांडूळ खत उत्पादनाचे प्रत्यक्ष शिक्षण घेत आहेत.
शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला जातो. त्यामुळे जमिनीच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो. जमिनीचे आरोग्य चांगले राखण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे आवश्यक आहे. सेंद्रिय खतांपैकी गांडूळ खत हे अत्यंत उपयुक्त मानले जाते. रासायनिक खतांना गांडूळ खत हा एक उत्तम पर्याय आहे. सेंद्रिय पदार्थांच्या जलद विघटनामध्ये गांडूळ महत्त्वाची भूमिका बजावतात आणि त्यांच्या वापरामुळे जमीन सुपीक बनते.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांमध्ये गांडूळ खताबाबत जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी विविध सेंद्रिय पदार्थांचा (शेणखत, भाताचा पेंढा, गिरीपुष्प व गांडुळे) वापर करून मोठ्या प्रमाणात गांडूळ खताचे उत्पादन केले आहे.
या उपक्रमासाठी कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाटचे प्राचार्य मा. संते सर तसेच विषय शिक्षिका डॉ. दर्शना कदम मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. चतुर्थ वर्षातील अभिनव पी.सी., अमिषा के.आर., निखिल अनुसे, संकेत आरडे, राकेश असणेकर, अतुल सी.ए., सत्यजित आवळेकर, गणेश भाकरे, ओम भांगरे, प्रतीक भोपळे, प्रांजल भोसले, अथर्व भोवर, जयवंत बोकारे , प्रज्ञा देशमुख, राहुल डिगे, पायल डोंगरे, चेतन गाडे, कांचन गायकवाड, सानिका गोडसे, सुमेध गोंगाले, योगेश हाके, सुजित हाके, विश्वजीत होनमाने, प्रथमेश इंगळे या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.












