शेतकरी दाखल्यासह दिव्यांगाना रेशन कार्डचे वितरण
बांदा (प्रतिनिधी) : शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने वेत्ये येथे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन वनिता पवार उपजिल्हाधिकारी पुनर्वसन विभाग यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून दीपप्रज्वलाने करण्यात आले. सावंतवाडी चे तहसीलदार श्रीधर पाटील नायत तहसीलदार रवींद्र निपाणीकर जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊत जितू गावकर सावंतवाडी पंचायत समिती सभापती जाधव,वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, परिसरातील सरपंच उपसरपंच सदस्य मंडळ अधिकारी सुधीर मालवणकर शेरला तलाठी मनीषा शिपुगडे,कास तलाठी सीमा माने आदी मान्यवर उपस्थित होते.
तहसील कार्यालय मध्ये महसूलच्या ज्या विविध ़सेवा उपलब्ध आहेत त्या मिळविण्यासाठी वेळ वाया जातो.त्या नागरिकांना आपल्या गावात मिळाव्या यासाठी या शिबिराचे आयोजन करून या ठिकाणी शेरले कास निगुडे रोणापाल इन्सुली क्षेत्रफळ कुंभारली वतये या गावातील शेतकऱ्यांना महसूलच्या विविध सेवांचा लाभ देण्यात आला त्यामध्ये सातबारा आठ रेशन कार्ड ,आयुष्यमान भारत सह सातबारा दुरुस्ती पत्नीचे नाव सातबारावर दाखल करणे उत्पन्नाच्या दाखल्यासह शेतकरी दाखल्यांचे या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले
या शिबिरात विशेष म्हणजे पाच दिव्यांगाना या ठिकाणी रेशन कार्डांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आलेवितरण . या शिबिराचा ला बहुसंख्य नागरिक व शेतकऱ्यांनी घेतला












