ग्राम रोजगार सेवक दिगंबर जाधव यांच्या कामांबाबत प्रशंसा
आचरा (प्रतिनिधी) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चिंदर येथे सुरू असलेल्या सिंचन विहीर, फळबाग लागवड, घरकुल यांची प्रत्यक्ष पाहणी करत कागद पत्रांची तपासणी उपजिल्हाधिकारी नितीन राऊत यांनी बुधवार २५ मार्च रोजी केली. त्यांनी सदर कामांबाबत समाधान व्यक्त करत दिगंबर जाधव यांच्या कामांबाबत प्रशंसा केली. यावेळी ग्रामरोजगार सेवक दिगंबर जाधव, एपीओ गांवकर, तांत्रिक अधिकारी गणेश अपराज, सागर ओरसकर, संदीप ठाकूर, रोहित पाटील आदी उपस्थित होते.












