महिला बालविकास सभापती नारकर यांचे पडेल सरपंच भूषण पोकळे यांच्याकडून अभिनंदन

देवगड (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद च्या नूतन महिला व बालविकास सभापती अनुराधा महेश (बंड्या) नारकर यांची पडेल सरपंच भुषण पोकळे यांनी सहकाऱ्यांसह सभापती दालनात भेट घेत शुभेच्छा दिल्या. अनुराधा नारकर यांची जिल्हा परिषद महिला बालविकास सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सभापती नारकर यांच्या दालनात भेट घेत सरपंच भूषण पोकळे यांच्यासह पडेल उपसरपंच विश्वनाथ पडेलकर, पं. स. सदस्य अंकुश ठुकरुल‌, राज नलावडे, महेश पडवळ, शशांक तावडे, सतीश परब, सुहास वाडेकर, रवींद्र मांजरेकर, यांनी पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!