वादळी अवकाळी पावसाचा फटका; नीमअरुळे येथे ट्रान्सफॉर्मर जमीनदोस्त, पाच गावांचा वीजपुरवठा खंडित

वैभववाडी (प्रतिनिधी) : गुरुवारी झालेल्या जोरदार वादळी अवकाळी पावसाने नीमअरुळे येथे वीज वितरणचा ट्रान्सफॉर्मर जमीन दोस्त झाला होता. त्यामुळे या परिसरातील पाच गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. या पार्श्वभूमीवर लोरे जि. प. सदस्या रिद्धी सुतार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच वीजपुरवठा लवकरात लवकर सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केली आहे.यावेळी निमरोळे सरपंच सज्जन माईनकर, अंकुश अंगवलकर, आदी उपस्थित होते. वीज वितरण कंपनीकडून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू असून शुक्रवारी संध्याकाळपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येईल. असे वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी जि. प. सदस्य सुतार यांना सांगितले आहे.

error: Content is protected !!