कणकवलीत १५ मे रोजी महाराजस्व अभियान चे आयोजन

एच पी सी एल सभागृहात संपन्न होणार महसूल सेवा शिबिर

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वतीने ‘महाराष्ट्र अभियान – शासन आपल्या दारी, सेवा आपल्या घरी’ अंतर्गत विशेष महसूल सेवा शिबिराचे आयोजन शुक्रवारी १५ मे रोजी सकाळी १० वाजता कणकवली कॉलेज येथील एसएमपीडी हॉलमध्ये करण्यात आले आहे.तहसील कार्यालय, कणकवली यांच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले असून, नागरिकांना विविध महसूल व शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.या शिबिरामध्ये ७/१२ व ८अ उतारे, फेरफार नोंदी, वारस नोंद, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखले यांसह संजय गांधी निराधार योजना, जमीन महसूल वसुली मार्गदर्शन, ई-पीक पाहणी माहिती तसेच रेशन कार्ड व मतदार यादी संदर्भातील मार्गदर्शन दिले जाणार आहे.नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!