विनयभंगाच्या गुन्ह्यात किशोर मालोंडकरला दीड वर्ष सश्रम कारावाससह दंड

सरकारी वकील रुपेश देसाई, संदीप राणे यांचा युक्तिवाद

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : एसटी बसमध्ये चढणाऱ्या युवतीशी लगट करण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केल्याच्या गुन्ह्यात आरोपी किशोर दिगंबर मालोंडकर ( वय 39, रा. मालोंड , ता. मालवण ) याला जिल्ह्या न्यायाधीश श्री. इंदलकर यांनी दीड वर्षे सश्रम कारावास सह 6 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. फिर्यादी पीडित युवती कुडाळ एसटी एसटी स्टँडवर कोल्हापूर च्या दिशेने जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना बसच्या दरवाज्याजवळ गर्दीचा फायदा घेत आरोपी किशोर दिगंबर मालोंडकर याने तीचा विनयभंग करून लगट करण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत युवतीच्या फिर्यादीनुसार आरोपी किशोर दिगंबर मालोंडकर विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात बी एन एस 75 (1 ) (i) नुसार 19 जुलै 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात झाली. सुनावणीदरम्यान फिर्यादी पीडित युवती, पंच भिसाजी माणगावकर, साक्षीदार आरती आनंद चव्हाण, तपासी अधीकारी महिला एपीआय वैशाली आडकुर यांच्या साक्ष तपासण्यात आल्या. सुनावणीदरम्यान सरकारी वकील रुपेश देसाई, सरकारी वकील संदीप राणे यांनी आरोपीने केलेला गुन्हा कोर्टासमोर सिद्ध केला.

error: Content is protected !!