ॲड. समृद्धी आसोलकर यांची भाजप मालवण ग्रामीण मंडल अध्यक्ष पदी नियुक्ती

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील वायंगणी गावची सुकन्या विद्यमान उपसरपंच ॲड. समृध्दी आसोलकर यांची भाजप मालवण ग्रामीण मंडल अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना भारतीय जनता पार्टी महिला जिल्हाध्यक्षा स्वेता कोरगांवकर यांचे भाजप मालवण तालुका ग्रामीण मंडल अध्यक्ष पदी निवडीचे पत्र प्राप्त झाले असून जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, मालवण ग्रामीण मंडल अध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आसोलकर या विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थावर काम करत असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!