गुंड प्रवृत्तीच्या पुजाऱ्यांची कायमस्वरुपी हकालपट्टी करा, पंढरपूरच्या धर्तीवर मोजक्या पुजाऱ्यांची नेमणूक करा
कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील परिते पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत मूक मोर्चा काढला. या मोर्चात पुजारी हटाव, असे फलक हातात घेऊन महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी जोतिबा डोंगरावरील पुजाऱ्यांनी भाविकांना केलेल्या मारहाणीचा निषेध नोंदवण्यात आला. मुजोर आणि गुंड प्रवृत्तीच्या पुजाऱ्यांची कायमस्वरुपी हाकलपट्टी करावी आणि पंढरपूरच्या धर्तीवर मोजक्या पुजाऱ्यांची पगारी नेमणूक करण्यात यावी, मारहाण करणाऱ्या पुजाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले.
या मोर्चात परिते गावचे सरपंच मनोज पाटील, शेतकरी सेनेचे सचिव जनार्दन पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अजित पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष सर्जेराव पाटील, भोगावती साखर कारखान्याचे संचालक सुनील कारंडे, विलास पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक सहभागी झाले होते.











