पावशी येथील श्रीदेवी सातेरी महिला दशावतार नाट्य मंडळाच्या नाट्यप्रयोगाचे आकर्षण !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : गावचे आराध्य, मारुतीवाडी येथील हनुमान मंदिरामध्ये, प्रतिवर्षाप्रमाणे हनुमान जयंती सोहळा संपन्न होणार आहे. त्यानिमित्ताने पहाटे पाच पासून सुश्राव्य कीर्तन. 6:45 वाजता हनुमान जन्मोत्सव,त्यानंतर आरती व प्रसाद वाटप. दुपारी महाप्रसाद यादरम्यान मंदिरांमध्ये स्थानिक मंडळांची सुस्वर भजने, रात्री नऊ वाजता श्री देवी सातेरी महिला दशावतार नाट्य मंडळाचा आकर्षण ठरणारा दशावतारी नाट्य प्रयोग होणार आहे. या उत्सवाचा गावातील भावीक ग्रामस्थांनी लाभ घ्यावा.असे आवाहन सावंत- पटेल परिवार ,व फोंडाघाट आयोजकांतर्फे करण्यात आले आहे












