बांदा (प्रतिनिधी) : रोणापाल – मडूरा तिठा येथील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिरात गुरुवार २ एप्रिल रोजी श्री हनुमान जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यनिमित्त सकाळी अभिषेक व पूजाअर्चा, श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी महाआरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होईल.सायंकाळी स्थानिकांचा भजनांचा कार्यक्रम व रात्री ७ वाजता अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ म्हापण यांचा नाट्यप्रयोग सादर होईल. सर्व भाविक भक्तांनी श्री दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री दक्षिणमुखी हनुमान देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.












