दीपक बेलवलकर यांच्या हॉटेल व्यवसायाची द्विदशकोत्तरपूर्ती
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली रेल्वे स्टेशनच्या अगदी दारात अशी ओळख असलेल्या श्री साई पॅलेस या हॉटेल अँड लॉजिंग चा 21 वा वर्धापनदिन गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी साजरा होत आहे. यानिमित्त सत्यनारायण पूजा आयोजित केली असून सायंकाळी रसिकांच्या मनोरंजनासाठी सुरमयी शाम हा सदाबहार हिंदी मराठी गीतांचा नजराणा पेश केला जाणार आहे. कणकवली शहरातील श्री बेलवलकर ज्वेलर्स चे मालक दीपक बेलवलकर यांनी 21 वर्षांपूर्वी श्री साई पॅलेस च्या माध्यमातून हॉटेल अँड लॉजिंग इंडस्ट्रीमध्ये पाय रोवला. कणकवली रेल्वे स्टेशनच्या पायऱ्या उतरल्यानंतर थेट श्री साई पॅलेस च्या दारात जाता येते त्यामुळेच कणकवली रेल्वे स्टेशनच्या दारात असलेले एक्झिक्युटिव्ह हॉटेल, लॉज बार अँड रेस्टॉरंट अशी अल्पावधीत ओळख श्री साई पॅलेस ने ग्राहकांच्या मनात निर्माण केली आहे. 21 व्या वर्धापनदिनानिमित्त 2 एप्रिल रोजी सायंकाळी 3 वाजता सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी 7 वाजता सुरमयी शाम हिंदी मराठी गीतांची सुरेल मैफिल सादर होणार आहे. कुडाळ येथील सुप्रसिद्ध गायक हर्षद मेस्त्री, आणि गोवा येथील गायिका स्नेहल गुरव ही सुरमयी शाम पेश करणार आहेत. त अभिनेता निलेश पवार यांचे लक्षवेधी असे निवेदन असणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन दीपक बेलवलकर आणि बेलवलकर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.












