कणकवलीत खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन कणकवली नगरपंचायत बॅडमिंटन कोर्ट येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेमुळे क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. १० एप्रिल २०२६ रोजी खासदार नारायण राणे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा दिनांक ५ एप्रिल २०२६ (रविवार) रोजी पार पडणार आहे. तालुक्यातील युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या कौशल्याला वाव मिळावा या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेत विविध गटांचा समावेश करण्यात आला असून, बक्षिसांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे:
ओपन सिंगल : प्रथम ₹५,०००, द्वितीय ₹३,०००
ओपन डबल : प्रथम ₹१०,०००, द्वितीय ₹६,०००
४० वर्षांवरील डबल : प्रथम ₹१०,०००, द्वितीय ₹६,०००
महिला सिंगल : प्रथम ₹५,०००, द्वितीय ₹३,०००
१५ वर्षांखालील सिंगल : प्रथम ₹५,०००, द्वितीय ₹३,०००

तसेच सर्व विजेते व उपविजेते खेळाडूंना पारितोषिके व मेडल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्र आणि टी-शर्ट देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा केवळ क्रीडा स्पर्धा नसून, युवकांमध्ये एकात्मता आणि स्पर्धात्मक भावना वाढविण्याचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री व शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सोम गांगण 7757902424 व मनीष करपे 8806689991 यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.

error: Content is protected !!