खारेपाटण येथील “लिटिल स्टार फन स्कूल” स्नेहसंमेलन उस्ताहात संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण शिवाजी पेठ येथील “लिटल स्टार फन स्कूल” या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या शाळेचे पहिले वार्षिक स्नेहसमेलन कार्यक्रम नुकताच खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कै. चंद्रकांत परीसा रायबागकर सभागृह शेठ न. म. विद्यालय खारेपाटण येथे नुकतेच संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे उद्घघाटन जिल्हा परिषद सदस्या प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, सम्मेद स्कूल कणकवलीचा संचालिका सन्मती ब्रम्हदंडे, लिटल स्टार फन स्कूलच्या संचालिका ऋतुजा राजेंद्र चिके, पालक प्रतिनिधी गौरी शिंदे, फारूक पावसकर, राजेंद्र चिके आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी जि. प. सदस्य प्राची ईसवलकर यांनी या लिटिल स्टार फन स्कूलचे आनंददायी शिक्षण उत्तम सुरू असून या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे काम या शाळेच्या शिक्षिका ऋतुजा चिके करत असल्याचे सांगून शाळेचे कौतुक केले. तर या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या कला गुणाचे अभिनंदन करून कौतुक केले.

यावेळी लिटल स्टार फन स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सुंदर नृत्यांनी ग्रामस्थाची मने जिंकले. तर पालकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार शाळेच्या संचालिका व शिक्षिका सौ ऋतुजा राजेंद्र चिके यांनी मानले.

error: Content is protected !!