कणकवलीत चोरांचा धुमाकूळ : सात दुकाने फोडली

कणकवली (प्रतिनिधी) : पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आचरा रोडवरील सात दुकाने चोरट्यांनी फोडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे शहरात बसवलेले शासकीय सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. मात्र एका दुकानाच्या खाजगी कॅमेऱ्यात चोरटा कैद झाला आहे. शनिवारी पहाटे सना कॉम्प्लेक्समधील 4 आणि राज मेडिकलसह अन्य तीन दुकानांची शटर उचकटून ही चोरी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक तेजस नलावडे, उपनिरीक्षक वृषाली बर्गे, हवालदार गुनिजन व पांडुरंग पांढरे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आता चोरट्याचा शोध घेत आहेत. भरवस्तीत झालेल्या या धाडसी चोरीमुळे पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

error: Content is protected !!