खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव यांनी घेतली पालकमंत्री नितेश राणे यांची भेट 

खारेपाटण बाजारपेठ रस्त्याबाबत झाली सकारात्मक चर्चा 

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मस्त्य व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांची खारेपाटण गावचे सरपंच महेंद्र गुरव यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली.यावेळी जि.प.सदस्य प्राची ईसवलकर व ग्रा.पं.सदस्य जयदीप देसाई उपस्थित होते.

खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव यांनी नामदार नितेश राणे यांची  त्यांच्या कणकवली येथील ओम गणेश निवास्थानी भेट घेत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी खारेपाटण गावातील विविध विकास कामाबाबत चर्चा करण्यात आली.तर खारेपाटण गावातील मुख्य रस्ता असलेला बाजारपेठ येथील रस्त्याबाबत नामदार नितेश राणे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून या रस्त्यासाठी अत्यावश्यक असणारा निधी उपलब्ध करून देण्यात येईल व या रस्त्याचे काम लवकरच पूर्ण करून देण्यात येईल असे आश्वासन नामदार नितेश राणे यांनी दिले असल्याचे खारेपाटण सरपंच श्री महेंद्र गुरव यांनी सांगितले.

error: Content is protected !!