वैभववाडी येथे पंडित दिनदयाल  प्रशिक्षणाला भाजपा कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वैभववाडी (प्रतिनिधी) : पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान अंतर्गत वैभववाडी भाजपा मंडलाचे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते करण्यात आले. 

या प्रशिक्षण शिबिराला एकूण 103 प्रशिक्षणार्थीनी सहभाग नोंदविला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, अभियान जिल्हा संयोजक प्रसन्न देसाई, मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, सभापती सिद्धेश रावराणे,  नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, माजी उपसभापती भालचंद्र साठे, सरचिटणीस शारदा कांबळे, उपसभापती साची कोलते, जि प सदस्य श्रावणी रावराणे, रिद्धी सुतार, पं. स. सदस्य देवानंद पालांडे, सुवर्णा संसारे, साधना नकाशे व पदाधिकारी उपस्थित होते.

शिबिराच्या पहिल्या सत्रात माजी आमदार प्रमोद जठार यांनी मार्गदर्शन केले. जठार म्हणाले, केंद्र व राज्य सरकार हे भाजपचे आहे. सत्तेच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचला पाहिजे. शेवटच्या माणसाला सुखी समाधानी करण्याचा निश्चय भाजपा कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. भाजपा ही पार्टी संस्कृतिचे संरक्षण करणारी पार्टी आहे. स्त्रीचा सन्मान करणे हे ब्रीद वाक्य घेऊन पक्ष चालत आहे. या पक्षात माणसाला गुरु न मानता भगवा ध्वजाला गुरु मानले जाते. प्रत्येकाला मिळालेल्या पदाच्या मागे एक मोठी तपश्चर्या आहे. त्याचे प्रत्येक कार्यकर्त्यांनी चिंतन करावे. पक्षाची निर्मिती कशी झाली हे कार्यकर्त्यांनी विसरू नये. संघर्षातून या पक्षाचा इतिहास उभा राहिला आहे. त्या इतिहासाचे आपण सर्वांनी संरक्षण करूया असं सांगितले. 

विलास हडकर म्हणाले, कोणताही समाज योग्य दिशेने जाण्यासाठी घटना असते. तशीच घटना भाजपाची आहे. भारत माता की जय ही पक्षाची मूळ घोषणा आहे. प्लास्टिकचा वापर सर्वांनी टाळला पाहिजे. पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिक हानिकारक आहे. विचारसरणीवर चालणारी पार्टी म्हणजे भाजपा होय असे सांगितले. प्रमोद रावराणे यांनी वर्ग गीत गायन करत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सावंत यांनी केले. सरळ ॲप नोंदणीसाठी अतुल सरवटे यांनी तर  पीपीटी व्यवस्थापनेसाठी अंकित सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.

error: Content is protected !!