भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा वैभववाडीच्या वतीने ,एक दिवशीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर उत्साहात संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी) : भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा वैभववाडीच्या वतीने एक दिवशीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर उंबर्डे बुद्ध विहार येथे उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी – वासुदेव बी .जुवाटकर होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला. प्रथम अध्यक्षांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला, आणि केंद्रीय शिक्षक जनिकुमार कांबळे यांनी भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. मार्गदर्शकांच्या वतीने दिप प्रज्वलीत करून कार्यक्रमाला सुरुवात केली.कार्यकर्ता कसा असावा? आणि त्याची आदर्श आचार संहीता,संस्थेने दिलेली २४ प्रकारची शिबीरे,यावर जनीकुमार कांबळे (केंद्रिय शिक्षक ) यांनी पहिल्या सत्रांत मार्गदर्शन केले .

तर दुसऱ्या सत्रांत,दि बुदिष्ट सोसायटी आंफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकारिणीची रचना ,पदाधिकाऱ्यांची जबाबदारी ,त्यांचे कर्तव्य ,आणि जिल्हा शाखेच्यावतीने १७ मे २०२६ रोजी होऊ घातलेल्या धम्म परिषदेची माहिती आणि पुर्व तयारीची संकल्पना आनंद कासार्डेकर-(विद्यमान सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष केंद्रिय शिक्षक भारतीय बौद्ध महासभा ) यांनी श्रवणीय मार्गदर्शन केले. पाहुणे व उपस्थितांचे श्रीपत कांबळे यांनी पुष्प देऊन कार्यकर्त्यांचे स्वागत केले .सुत्रसंचलन सरचिटणीस विनोद कदम कुंभवडेकर यांनी केले .

सदानंद कदम (कोषाध्यक्ष) संदिप जाधव, रविंद्र जंगम (बौद्धाचार्य) किरण भोसले ,सुरेश भोसले ,प्रकाश जाधव ,महेंद्र कदम (कणकवली कोषाध्यक्ष) संजय कांबळे, रमेश कांबळे सर ,(तरेळे शाखा सरचिटणीस )नाधवडे गावच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या . शेवटी अध्यक्षीय भाषण झाल्यावर सामुदायीक सरणेत्तेय घेऊन सायंकाळी ५ वाजता कार्यकर्ता शिबीराचे समारोप करण्यात आले.

error: Content is protected !!