फोंडाघाट येथील १०७ वर्षाच्या आनंदीबाई हुमरेकर यांचे निधन

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट गावातील विद्यानगर येथील रहिवाशी असणाऱ्या सुमारे चार पिढ्यांचा सहवास लाभलेली आजी आनंदीबाई अनंत हूमरेकर वय१०७ वर्षे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले आहे.

फोंडाघाट मधील कृषी संशोधन केंद्र याठिकाणी आपली प्रदीर्घ सेवा देऊन नंतर मुलगी आणि नातवंडे यांच्या सहवासात आपल्या आयुष्यात जवळपास चार पिढ्यानं सोबत आजपर्यंत आनंदाने चालून बोलून असणारी आजीचे आज सकाळी दुःखद निधन झाले असून चार पिढ्याचे एक पर्व संपल्याने हळहळ व्यक्त होत होती.

त्यांच्या पश्चात एक मुलगी सुचित्रा सुरेंद्र दाभोळकर, त्यांची मुले, सुना, नातवंडे तसेच रावराणे कुटुंबातील नातवंडे असा मोठा परिवार आहे

error: Content is protected !!