अन्यथा उपोषण; भर सभेत पं. स. सदस्य लक्ष्मण गावडेंचा इशारा

कणकवली (प्रतिनिधी) : पिडब्ल्यूडी कडून हमरस्त्यावर करण्यात आलेल्या वृक्षलागवड आणि वृक्षांच्या जाळी कामात भ्रष्टाचार झाला असुन याबाबत लेखी तक्रार करूनही माहिती देण्यात आलेली नाही. पुढील मासिक सभेत याबाबत माहिती न मिळाल्यास उपोषण छेडण्याचा इशारा पं. स. सदस्य लक्ष्मण उर्फ प्रदीप गावडे यांनी कणकवली पंचायत समितीच्या मासिक सभेतच दिला.

याबाबत पिडब्ल्यूडी अभियंत्यांना प्रश्न विचारताना पं. स. सदस्य गावडे म्हणाले की हमरस्त्यानजीक करण्यात आलेली वृक्षलागवड ही बोगस आहे. वृक्षांना लावण्यात आलेली जाळी जिओ टॅगिंग साठी फोटो काढल्यानंतर तीच जाळी पुढील वृक्षाला लावण्यात आली आहे. याबाबतचा व्हिडिओही आपल्याकडे असल्याचा दावा पं. स. सदस्य गावडे यांनी केला. बोगस वृक्षारोपण आणि जाळी बसवूनही संबंधित ठेकेदाराला 17 लाख रुपयांचे देयक अदा करण्यात आले आहे. याबाबत पुढील मासिक सभेत योग्य माहिती सभागृहात पिडब्ल्यूडी अभियंत्यांनी सादर करावी अन्यथा उपोषणाचा इशारा पं. स. सदस्य गावडे यांनी दिला.

error: Content is protected !!