मान्सूनपूर्व ट्री कटिंग करा, स्पेसर लावा

उपसभापती सोनू सावंतांच्या महावितरण अधिकाऱ्यांना सूचना

कणकवली (प्रतिनिधी) : पावसाळा तोंडावर आहे त्यामुळे वेळीच ट्री कटिंग करा, आवश्यक ठिकाणी स्पेसर लावा अशा सूचना कणकवली उपसभापती राजेश उर्फ सोनू सावंत यांनी महावितरण अधिकाऱ्यांना कणकवली पं. स. मासिक सभेदरम्यान केल्या. पावसाळ्यात महावितरणच्या कटिंग लाईनवर झाडांच्या फांद्या पडून विजपुरवठा खंडित होतो. याचा त्रास विजग्राहकाना होतो. यासाठी मान्सूनपूर्व ट्री कटिंग करा. तसेच योग्य ठिकाणी स्पेसर लावावेत अशा सूचना उपसभापती सोनू सावंत यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिल्या. याबाबत वेळेत योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही महावितरण अधिकाऱ्यांनी दिली.

error: Content is protected !!