नगरसेविका आर्या राणे यांच्या मागणीला यश
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील मसुरकर किनई रोड ते गांगो मंदिर पर्यंत रस्त्याच्या मजबुतीकरण ला सुरुवात झाली आहे. मसुरकर किनई रोड मजबुतीकरण साठी नगरपंचायत निवडणूकी आधी निविदा मंजूर झाली होती. मात्र आचारसंहिता काळात हे काम सुरू झाले नव्हते. कणकवली आचरा रोडवरून नांदगाव च्या दिशेने होणारी अवजड वाहनांची वाहतूक मसुरकर किनई रोडवरून केली जाते. या रस्त्याची डागडुजी होऊन मंजूर निविदेनुसार मसुरकर किनई रोड मजबुतीकरण लवकर सुरू करण्याबाबत नगरसेविका आर्या राणे यांनी अलीकडेच झालेल्या नगरपंचायत सभेत आवाज उठवला होता. नगरसेविका आर्या राणे यांच्या मागणीला यश आले असून संबंधित ठेकेदाराने मसुरकर किनई रोड मजबुतीकरण चे काम आता सुरू केले आहे. याबाबत स्थानिक शहरवासीयांत समाधान व्यक्त होत आहे.












