जि.प.अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते शानदार उदघाटन……

नारायण राणे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार  नारायण राणे  यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त  वैभववाडी विधानसभा मतदार संघाच्यावतीने सिंधुनायक चषक 2026 या राष्ट्रीय स्तरावरील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे शानदार उदघाटन झाले. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी श्रीफळ वाढवून उदघाटन केले.

यावेळी जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे,वैभववाडी सभापती सिध्देश रावराणे,कणकवली सभापती हर्षदा वाळके,उपसभापती सोनु सावंत,भाजपा युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री,कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, कणकवली मंडळाध्यक्ष दिलीप तळेकर,देवगड मंडळाध्यक्ष बंड्या मांजरेकर, वैभववाडी मंडळाध्यक्ष सुधीर नकाशे,माजी उपाध्यक्ष नासीर काझी, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, जि.प.सदस्य संतोष पारकर, रिद्धी सुतार, श्रावणी रावराणे, पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे, सुवर्णा संसारे, नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, प्राची तावडे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष निसार शेख,व्यापारी संघटना जिल्हाध्यक्ष संजय सावंत,माजी सभापती बाळा जठार, कलाकार मानधन समिती अध्यक्ष संतोष कानडे ,माजी सभापती बाप्पी मांजरेकर,पं.स.सदस्य सहदेव खाडये,राजा जाधव,देवानंद पालांडे, शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश गुरव,अजय रावराणे,संजय चव्हाण,राजेंद्र राणे, महेश संसारे, रितेश सुतार, आदी मान्यवर उपस्थित होते.

दिनांक 5 ते 9 एप्रिल 2026 या कालावधीत नाधवडे  येथील श्री महादेव मंदिर मैदान येथे ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धेसाठी 64 संघ सहभागी झाले आहेत. प्रकाश झोतात होणाऱ्या स्पर्धेतील प्रथम विजयी संघाला 5 लाख 75 हजार 575 रोख,  आणि उपविजेत्या संघाला 2 लाख
तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक व सामनावीर यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच महिला व पुरुषांसाठी विशेष लकी ड्रॉ काढण्यात येणार असून त्यामध्ये विविध बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

error: Content is protected !!