पोलीसांकडून संबंधित दुकानात चौकशी ; कस्टम अधिकाऱ्यांना पडताळणीसाठी पत्र
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली बाजारपेठेतील एका दुकानात चक्क मेड इन पाकिस्तान प्रोडक्ट विक्री होत असल्याच्या संशयावरून कणकवली पोलिसांनी त्या दुकानात जात चौकशी केली. कासार्डे येथील संजय नकाशे यांनी पोलिसांकडे कणकवली बाजारपेठेतील एका दुकानात मेड इन पाकिस्तान लिहिलेल्या वस्तूंची विक्री होत असल्याची माहिती दिली. याची खात्री करण्यासाठी स्वतः पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांनी संबंधित दुकानात जात चौकशी केली प्राथमिक पाहणी केली. कस्टम तसेच फूड अँड ड्रग्ज खात्याच्या अधिकाऱ्यांना त्या दुकानातील वस्तबाबत चौकशी करण्याबाबत लेखी कळविले असल्याचे पोलीस निरीक्षक नलवडे यांनी सांगितले.












