कणकवली : (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री तथा खासदार नारायणराव राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी कणकवलीच्या वतीने विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजता भालचंद्र महाराज आश्रम येथे महारुद्र स्वाहाकार आयोजित करण्यात आला असून त्यानंतर दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री व शहराध्यक्ष सुरेंद्र (आण्णा) कोदे यांनी केले आहे.












