खारेपाटण येथील शुक नदीत युवक बुडाला

तीन दिवसांनी सापडला मृतदेह

खारेपाटण (प्रतिनिधी) : टाकेवाडी येथील मूळ रहिवासी असलेला दत्ताराम उर्फ दत्तू रामचंद्र सुतार वय ४९ वर्षे या युवकाचा मृतदेह आज सोमवार दि.६ एप्रिल २०२६ रोजी सायं.५.०० वाजता खारेपाटण येथील शुक नदी पात्रातील जैन पार या ठिकाणी फुगलेल्या अवस्थेत आढळला.दरम्यान सदर युवकाचा मृत्यू हा पाण्यात बुडून झाला असल्याचे समजते.

या घटनेची माहिती मिळताच खारेपाटण जि.प.सदस्य सौ प्राची ईसवलकर सरपंच महेंद्र गुरव, माजी सरपंच रमाकांत राऊत, ग्रा.पं.सदस्य जयदीप देसाई,विजय सावंत,बंटी गोसावी,पोलिस पाटील ओंमकार चव्हाण यांनी तातडीने घटना स्थळी भेट देऊन पोलिस व आरोग्य यंत्रणेला माहिती दिली.

याबाबत अधिक वृत्त असे की,खारेपाटण टाकेवाडी येथील दत्तू सुतार हा विवाहित युवक छोटी मोठी सुतार काम करून किंवा वेळ प्रसंगी मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदार निर्वाह करत होता. परंतु गेले दोन दिवस तो घरातून निघून गेला तो परत आला नव्हता.त्याच्या नातेवाईकांकडून त्याचा सर्वत्र तपास करण्यात आला परंतु तो कुठेच सापडला नाही.तर तो हरवला असल्याची माहिती खारेपाटण पोलिस स्टेशन ला देण्यात आली होती.अखेर आज सोमवार सायं.५.०० वाजता तिसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह खारेपाटण येथील शुक नदी पात्रात आढळून आला.

युवक बुडाल्याची माहिती खारेपाटण पोलिस स्टेशनला समजताच खारेपाटण पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी मिलिंद देसाई हे घटनास्थळी दाखल झाले.सदर माहिती नातेवाईकांनी दिली.मयत दत्तू सुतार याच्या पत्नीने बुडालेला युवक आपला पती असल्याची खात्री पटल्यावर
खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रिया वडाम घटनास्थळी दाखल होऊन शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.त्याच्या पाश्चात पत्नी व १ लहान मुल असा परिवार आहे.या घटनेचा अधिक तपास खारेपाटण पोलिस दुरशेत्राचे पोलिस अधिकारी करत आहेत.

error: Content is protected !!