खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्यावतीने खारेपाटण येथे रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार नारायणराव राणे यांच्या अमृत महोत्सवी ७५ व्या वाढदिवसा निमित्त शिवसेना शिंदे गट खारेपाटण विभागाच्या च्या वतीने दि.१० एप्रिल २०२६ रोजी स.९.०० ते दु.१.०० या वेळेत खारेपाटण येथील शेठ न मविद्यालय येथे भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचे अयोजन करण्यात आले असून याबाबतची माहिती शिवसेना कणकवली तालुका प्रमुख श्री मंगेश गुरव व पंचायत समिती सदस्य श्री गुरुप्रसाद शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

कोकणचे भाग्य विधाते खासदार नारायण राणे यांचा वाढदिवसा खारेपाटण हायस्कूल येथे शिवसेना पक्षाच्या वतीने साजरा करण्यात येणार असून यानिमित्ताने भव्य रक्तदान शिबिर व भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये शुगर ,बी पी,हृदय तपासणी व्हेरि व्हेन्स,अस्थिरोग,मज्जासंस्था, किडनी स्टोन,कर्करोग तपासणी आदी आदी रुग्णांची तपासणी या शिबिरात करण्यात करण्यात येणार आहे.

या शिबिराचे आयोजन सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा कणकवली व रोटरी क्लब ऑफ खारेपाटण आणि शिवसेना विभाग खारेपाटण यांच्या वतीने संयुक्तिक रित्या करण्यात आले आहे. तरी या शिबिराचा लाभ जास्तोत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन शिवसेना पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री मंगेश गुरव यांनी केले आहे.तसेच ज्यांना या सर्वसाधारण मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते श्री सुहास राऊत – ९५९५७१७१२१ व श्री मंगेश गुरव – ९४२२४३३७६० यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!