भाजपा स्थापना दिनानिमित्त वेंगुर्ले येथील रुग्णालयात रूग्णांना फळेवाटप कार्यक्रम संपन्न
वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आम.रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महाराष्ट्र युवा नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून आज वेंगुर्ले शहरातील विविध रुग्णालयात भाजपातर्फे रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. यावेळी नगरसेवक सचिन शेटये , नगरसेविका रिया केरकर , नगरसेवक युवराज जाधव , नगरसेवक सदानंद गिरप, नगरसेवीका काजल कुबल, नगरसेवीका गौरी माइणकर आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हा भाजपाचा संदेश जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्थापना दिनाचे औचित्य साधत हा कार्यक्रम करण्यात आला. भविष्यात मतदारसंघात भाजपा दिलेला शब्द पूर्ण करेल आणि लवकरच आरोग्य सेवेचे दालन सर्वसामान्य जनतेसाठी खुले होईल असे भाजपा पदाधिकाऱ्यांनी विश्वास व्यक्त केला.












