तळेरे (प्रतिनिधी) : ओझरम विजयदुर्ग रोड नजीक असलेल्या आदित्य स्क्रॅप मर्चंट या गोडाऊनला सुमारे 11.30 ते 12 च्या सुमारास अचानक आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे.
आगीची भिषणता लक्षात घेऊन गोडाऊन मालक शशिकांत इंगळे यांनी तात्काळ कणकवली चे नगराध्यक्ष संदेश पारकर यांना माहिती दिली व अग्निशमन बंब तात्काळ उपलब्ध करून मिळावे असे सांगितले,
त्यानंतर काही वेळातच अग्निशामक बंबची गाडी घेऊन कर्मचारी निलेश बागवें व त्याचे सर्व सहकारी घटनास्थळी दाखल झाले ही आग इतक्या मोठ्या प्रमाणात होती की आग आटोक्यात येण्यासाठी सुमारे दोन ते तीन तास लागले.
त्यानंतर आग आटोक्यात आली या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे तसेच ही घटना समजतात जागेचे मालक गोट्या कल्याणकर यांनी देखील आग विजवण्याचा प्रयत्न केला तसेच घटनास्थळी कासार्डे जि. प.सदस्य संतोष पारकर ओझरम गावचे माजी सरपंच प्रशांत राणे, अन्नप्पा इंगळे, राजू इंगळे,शाम वाघमारे, सागर वास्टर,ऋतिक वास्टर आदित्य इंगळे दाखल होत आग विझविण्यास मदत केली.
तसेच घटनेची माहिती मिळताच
ग्राम महसूल अधिकारी सुरज शिंदे, महसूल सेवक दीपक आरेकर व ओझरम गावाचे पोलीस पाटील श्री. तुषार तांबे यांनी येऊन पुढील पंचनामा सुरु केला आहे.











