सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : ए. डी. फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित ‘भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार २०२६’ जाहीर करण्यात आले असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रज्ज्वल विनोद गायकवाड इनामदार यांची ‘आदर्श फोटोग्राफर अँड व्हिडिओ एडिटर’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
देवगड तालुक्यातील बापर्डे येथील रहिवासी असलेल्या प्रज्ज्वल गायकवाड यांनी फोटोग्राफी व व्हिडिओ एडिटिंग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या सर्जनशीलतेमुळे आणि उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना हा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात येत आहे. त्यांच्या या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, १२ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३ वाजता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, गणेशखिंड, स्वारगेट, पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
ए. डी. फाऊंडेशनचे संस्थापक अशोक गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा आयोजित करण्यात आला असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांना या वेळी सन्मानित करण्यात येणार आहे. प्रज्ज्वल गायकवाड यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.














