मोठी बातमी !केंद्रीयमंत्री नारायण राणे 6 मे ला बारसुत

रिफायनरी समर्थनासाठी काढणार महामोर्चा

कणकवली (प्रतिनिधी): 6 मे रोजी बारसू रिफायनरी च्या समर्थनार्थ केंद्रीयमंत्री नारायण राणे, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे हेलिकॉप्टर बारसुत उतरणार आहे असे भाजपा आमदार नितेश राणे यांनी सांगितले. कोकण विकास व्हावा असे वाटणारे सर्व बारसू मध्ये येणार आहोत. माजी खासदार निलेश राणे, भाजपा प्रदेश सचिव प्रमोद जठार यांच्यासह भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी 6 मे ला बारसुत जाणार आहोत. रिफायनरी च्या समर्थनासाठी आम्ही मोर्चा काढणार आहोत.कोकणातील मुले आर्थिक सक्षम व्हावी , ज्यांना कोकणात रोजगार यायला हवा असे वाटते असे आम्ही सर्वजण बारसू मध्ये एकवटणार आहोत. आम्ही पोलीस प्रशासन, राज्य सरकार, रत्नागिरीतील स्थानिक प्रशासनाने आम्हाला जागेची परवानगी द्यावी असे भाजपा आमदार नितेश राणे म्हणाले. कोकणात राहूनच कोकणी मुले आर्थिक सक्षम व्हायला हवेत. यासाठी बारसू रिफायनरी व्हायला हवी असे आ नितेश राणे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!