आ. नितेश राणेंनी काढले वाभाडे
कणकवली (प्रतिनिधी): चपट्या पायाचा खा संजय राऊत बेळगाव दौऱ्यावर तावातावाने बेळगावात बोलतोय.मराठी माणसांच्या विरोधात भाजपा फौज उभी करतोय म्हणतोय. शकुनीमामा ,लोकप्रभा च्या वेळची मस्ती विसरला असशील तर आठवण करून देतो.कारट्या संजय, जेव्हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नी बेळगाव बाबत आंदोलन सुरू होते तेव्हा तू नेमका कुठे होतास ? सामना मध्ये की लोकप्रभा मध्ये होतास ? शिवसेनेबद्दल तुला काही माहिती आहे काय ? सरड्या सारखा रंग बदलणारा संजय राऊत कारटा आहे. लोकप्रभात असताना हिंदू समाजाविरोधात आर्टिकल राऊत जे लिहिलेत. समाजवादी विचारांचा असणारा होता राऊत. हिम्मत असेल तर मी बोलतोय ते खोटे असल्याचे सांग. बाळासाहेबांच्या बेळगाव आंदोलनाबद्दल बोलण्याचा संजय राजाराम राऊत ला अधिकार नाही. एक दिवस पत्रकार परिषदेत लोकप्रभात संजय राऊत ने छापलेली आर्टिकल वाचून दाखवली तर संजय ला बेळगावात लोक चप्पलने मारतील.आजच्या सामनातील अग्रलेख वाचल्यावर समजेल की हा पवार कुटुंबात आग लावतोय. हा कारटा घरात घेण्याच्या लायकीचा नाही. बेळगावात भाजपा उमेदवाराविरोधात प्रचाराला न येण्यासाठी संजय राऊत कडून पैशांची मागणी केली जाते याचे कॉल रेकॉर्डिंग आहे.चाटुगिरी करण्यात राऊत ची पीएचडी आहे . जसा मालक तसा कामगार आहे. उद्धव ने आयुष्यात हेच केले.नारायण राणेंनी शिवसेना का सोडली ? उध्दवने उमेदवारीसाठी पैसे मागितल्याचा भांडाफोड केला म्हणून राणेंविरोधात षडयंत्र रचले.साधा संपादक असलेला राऊत आलिशान गाड्या कशा फिरवतो ? ह्याचे व्यवसाय काय ? कुठून आणतो पैसा ? याचे उत्तर आहे ब्लॅकमेलिंग चा धंदा.












