संत शिरोमणी गोरोबा काका पुण्यतिथी सोहळा; कोकिसरे येथे तीन दिवस विविध कार्यक्रमांची मेजवानी…

वैभववाडी (प्रतिनिधी) : कोकिसरे कुंभार समाजाच्यावतीने मंगळवार दिनांक १४ एप्रिल ते गुरुवार दिनांक १६ एप्रिल २०२६ या कालावधीत संत शिरोमणी गोरोबा काका पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. तर १६ एप्रिल रोजी आयोजित रस्सीखेच स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

सोहळ्याची सुरुवात १४ एप्रिल रोजी सकाळी साडेपाच वाजता काकड आरतीने होणार आहे. यानंतर नित्यपूजा, श्री सिद्धेश्वर मंदिरात अभिषेक व पूजापाठ, हरिपाठ वाचन, महाआरती, पंचक्रोशीतील महिलांसाठी हळदीकुंकू, तसेच वार्षिक पारितोषिक वितरण व गुणगौरव समारंभ होणार आहे. या कार्यक्रमासाठी सभापती सिद्धेश रावराणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भक्ती संगीत, सुस्वर भजने व महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दिनांक १५ एप्रिल रोजी सकाळी काकड आरतीनंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी व संत गोरोबा काका मूर्तीवर अभिषेक व पूजा होईल. सकाळी ११ ते १२.३० या वेळेत हभप दीपक महाराज पांचाळ यांचे कीर्तन, तसेच श्री ज्ञानेश्वर माऊली सांप्रदायिक भजन मंडळ, खंबाळे यांचे भजन सादर होणार आहे. दुपारी महाआरती व महाप्रसादानंतर सायंकाळी ४ वाजता संत गोरोबा काका मंदिर ते सिद्धेश्वर मंदिर, कोकिसरे असा भव्य दिंडी सोहळा काढण्यात येणार आहे.
गुरुवार दिनांक १६ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता भव्य रस्सीखेच स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेत्यास ₹७,७७७ व द्वितीय क्रमांक विजेत्यास ₹५,५५५ रोख बक्षीस तसेच आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

या पुण्यतिथी सोहळ्याचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कोकिसरे कुंभार समाजाचे अध्यक्ष मोहन पोर्लेकर व सचिव संदीप जांभवडेकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!