कणकवली (प्रतिनिधी) : कोकणचे भाग्यविधाते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नामदार नारायणराव राणे साहेब यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा झाला. याच औचित्याने आयडियल स्पेशल स्कूल वरवडे येथील गतिमंद विद्यार्थ्यांना ज्ञानदा शिक्षण संस्था कार्याध्यक्ष तसेच माजी उपसभापती पंचायत समिती कणकवली,बुलंद पटेल यांच्या सौजन्याने खाऊ वाटप करण्यात आले.राणे साहेबांच्या कार्य कर्तृत्वाचा ठसा हा अगदी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचला आहे.
यावेळी ज्ञानदा शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे,ज्ञानदा शिक्षण संस्था कार्याध्यक्ष तसेच माजी उपसभापती पंचायत समिती कणकवलीचे श्री.बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्रा. हरीभाऊ भिसे,आयडियल च्या मुख्याध्यापिकाअर्चना देसाई तसेच स्पेशल स्कूल च्या शिक्षिका मंजिरी घेवारी,पुरुषोत्तम पाताडे,मीना शिंगाडे विठू प्रभू सर,राजू कदम सर आदी मान्यवर उपस्थित होते.












