संत शिरोमणी संत सेना महाराज जयंती वैभववाडीत उत्साहात साजरी होणार

पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा सिंधुदुर्ग यांच्यावतीने श्री संत शिरोमणी श्री संत सेना महाराज यांची जयंती मंगळवार दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी सुमित्रा मंगल कार्यालय एडगाव येथे सकाळी ९  ते ५  या वेळेत साजरी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री नितेश राणे उपस्थित राहणार आहेत.

यानिमित्त सकाळी ९  वाजता भव्य शोभायात्रा दत्त मंदिर ते सुमित्रा मंगल कार्यालय अशी होणार आहे.  १० वाजता अल्पोपहार, १०. ३० वाजता संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन,  १०. ४५  वाजता ह.भ.प. सुरेश पांचाळ यांचे कीर्तन होणार आहे. दुपारी १२. ३० वाजता मान्यवरांचे भाषणे होणार आहेत. दुपारी १. ३० वाजता स्नेहभोजन तर ३  नंतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.  यामध्ये खेळ पैठणीचा होम मिनिस्टर तसेच महिला व मुलांसाठी विविध फनी गेमस होणार आहेत.

तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे. असे आवाहन राज्य संघटक विजय चव्हाण जिल्हा अध्यक्ष जगदीश चव्हाण व वैभववाडी तालुका अध्यक्ष विजयानंद कदम यांनी केले आहे.

error: Content is protected !!