प्रशासन काळातील भ्रष्ट कारभाराचा वाचला पाढा
कणकवली (प्रतिनिधी) : नगरपंचायत विशेष सभेत प्रशासकीय काळात झालेली 21 टेंडर रद्द करण्यात आली.एकाच ठेकेदाराला ही सगळी 8 कोटी रक्कमेची कामे देऊन त्यातून भ्रष्टाचार सुरू होता. मराठा मंडळ ते स्मशानभूमी गटार बांधकामात काळा दगड वापरायचा होता. त्याऐवजी जांभा दगड वापरून निकृष्ट काम केले.तेली आळी येथील बांधलेली सार्वजनिक विहीर नगरसेवक बंडू हर्णे यांच्या घरामागे बांधली आहे. सार्वजनिक विहिरीला इलेक्ट्रिक पंप वापरता येत नाही.तिथं 6 पंप लावून पाणीउपसा होतोय. इथेही ठेकेदार एकच. टेम्बवाडी येथील फुटपाथ चेही काम निकृष्ट आहे. पटकीदेवी मंदिर ते रेल्वे स्टेशन जुना रोड रस्त्याचेही निकृष्ट काम केले. 2018 ते 2025 दरम्यान एकाच ठेकेदाराला तब्बल 142 कामे देऊन तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचार केला आहे. यातून त्या ठेकेदाराचा विकास झाला आहे. मात्र कणकवलीकर जनतेच्या पैशांची उधळपट्टी केली आहे. कणकवली नगरपंचायत मध्ये झालेल्या बोगस कामांची तक्रार मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे प्रधान सचिव यांच्याकडे तक्रार केली असून संबंधित ठेकदारावर कडक कारवाई करण्याचे निर्देश नगरविकासमंत्र्यालयाकडून देण्यात आल्याचे नगरसेवक बाळू पारकर म्हणाले. भ्रष्टाचाराची पोलखोल होऊ नये यासाठी आमच्याच आघाडीतील प्रसाद खायची सवय असलेल्या काही माजी नगरसेवकांमार्फत सेटलमेंट चे प्रयत्न केले गेले. पण आम्ही त्याला भीक घालणार नाही. भ्रष्टाचारमुक्त कणकवली हा आमचा निवडणूक आधी नारा होता. आमची सत्ता आल्यानंतर जि टेंडर लागली ती स्पर्धेतून बिलो रेट ने दाखल झाली तीच टेंडर मंजूर झाली असून यापुढे कणकवली नगरपंचायत मध्ये भ्रष्टाचारमुक्त कारभार दिसेल.












