हिंदू संस्कृतीच्या रक्षणासाठी महापुरुषांचे स्मरण आवश्यक – पवन बांदेकर

भुईबावडा येथे हिंदू संमेलन उत्साहात

वैभववाडी (प्रतिनिधी) : हिंदू संस्कृतीच्या रक्षणासाठी  महापुरुषांचे कार्य, त्याग व पराक्रम महत्वाचे आहेत, यामुळेच आज आपण हिंदू म्हणून स्वतःला म्हणून घेतो आहोत. आशा थोर महापुरुषांच्या पराक्रमाचे व बलिदानाचे आपण स्मरण केले पाहिजे. असे आवाहन प्रमुख वक्ते पवन रामा बांदेकर यांनी केले आहे.

सकल हिंदू संमेलन भुईबावडा आदर्श विद्यालय पटांगण येथे संपन्न झाले. संमेलनाची सुरुवात दीप प्रज्वलन तसेच भारतमाता व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजनाने मान्यवरांच्या हस्ते झाली. हेत हायस्कूलच्या मुलींच्या सुमधुर सुरांनी स्वागत व ईशस्तवन सादर केले.

संघशताब्दी निमित्त हिंदू संमेलनाच्या माध्यमातून संघाचा शंभर वर्षाचा इतिहास बांदेकर यांनी समाजापुढे मांडला तसेच हिंदू समाजापुढील आव्हाने कोणती असतील याची मांडणी त्यांनी केली. पंच परिवर्तनाचा विचार लहान लहान गोष्टीच्या माध्यमातून समजावून सांगितले.

ह. भ. प. कुमारी सायली गावडे  यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श प्रत्येक व्यक्तीने  डोळ्यासमोर ठेवून आपलं कार्य केलं पाहिजे असे प्रबोधन करताना कीर्तनाच्या माध्यमातून सांगितले.

संघशताब्दी निमित्त हिंदू संमेलनाच्या माध्यमातून संघाचा शंभर वर्षाचा इतिहास त्यांनी समाजापुढे मांडला तसेच हिंदू समाजापुढील आव्हाने कोणती असतील याची मांडणी त्यांनी केली. पंच परिवर्तनाचा विचार लहान लहान गोष्टीच्या माध्यमातून समजावून सांगितले.

या कार्यक्रमासाठी उंबर्डे व भुईबावडा मांगवली आदी वीस गावातील लोकांनी सक्रिय सहभाग घेऊन संमेलन यशस्वी केले. तसेच भुईबावडा ग्रामस्थांच विशेष सहकार्य लाभले. हिंदू संमेलनाच्या आयोजनासाठी स्थापन केलेल्या सकल हिंदू समितीने उत्तमरीत्या नियोजन केल.  संमेलनाची सांगता संपूर्ण वंदे मातरम् या गीताने करण्यात आली.

error: Content is protected !!