वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाची उज्वल परंपरा कायम ठेवून जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू सर्वांना सोबत घेऊन व्यापारी महासंघ अधिक मजबूत मदत करून व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे नूतन अध्यक्ष संजय सावंत यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा पदग्रहण सोहळा वृंदावन रिसॉर्ट वैभववाडी येथे संपन्न झाला यावेळी अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सावंत बोलत होते.
उपाध्यक्ष दीपक भोगले पुंडलिक दळवी अवधूत शिरसाट कार्यवाह राजू जठार सहकार्य व राजन नाईक कोषाध्यक्ष नंदन वेंगुर्लेकर तसेच वैभववाडी तालुका अध्यक्ष तेजस आंबेकर, सचिव सुरेंद्र नारकर, संतोष कुडाळकर यांच्यासह वैभववाडी तालुक्यातील सर्व व्यापारी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
महासंघाचे माजी कोषाध्यक्ष नेवाळकर यांनी इतिवृत्त वाचून सभेला सुरुवात केली.
यावेळी महासंघाच्या विविध विषयावर चर्चा करून तसे ठराव घेण्यात आले.
वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने उपस्थित सहा ज्येष्ठ व्यापाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच वैभववाडी तालूका संघाच्यावतीने संजय सावंत यांचा व वैभववाडी तालूका महिला व्यापारी संघाचा सुद्धा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन महासंघाचे कार्य व राजू जठार यांनी केले.












