आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील स्वामी समर्थ मठ वायंगणी येथे बुधवार १५ एप्रिल रोजी स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा साजरा होणार असून त्यानिमित्ताने सकाळी ५ वाजता दुग्धाभिषेक, सकाळी ७.३० नित्य आरती, सकाळी ९ वाजता अभिषेक, सकाळी ११ ते संध्याकाळी ६ वा. स्थानिक भजने, दुपारी १२.३० महाआरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद, दुपारी १ वाजता ह. भ. प. परब महाराज (वायंगवडे-मालवण) यांचे पूर्वरंग नाथांना दत्त प्रदर्शन, सदगुरु महात्म नारदिय किर्तन आदी कार्यक्रम होणार असून भाविक भक्तांनी दर्शन, महाप्रसाद, किर्तन यांचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वामी समर्थ सेवा मंडळ, वायंगणीच्या वतीने करण्यात आली आहे.
स्वामी समर्थ मठ वायंगणी येथे १५ एप्रिल रोजी स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी…!












